कोल्हापूर • प्रतिनिधी
संयुक्त उत्तरेश्वर – शुक्रवार पेठ शिवाई ग्रुपच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजन्म काळ झाल्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त सौ. कादंबरी बलकवडे, भाजप प्रदेश प्रवक्ते माजी खासदार धनंजय महाडिक आदींच्या प्रमुख उपस्थितीत सौ. यशश्री घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुले – मुली यांनी शिवजन्मोत्सवानंतर शिवगर्जना सादर केली.
यावेळी उपस्थितांनी या छोट्या मावळ्यांचे कौतुक केले. यावेळी माजी नगरसेवक रमेश पोवार, गणी आजरेकर, ईश्वर परमार, किशोर घाटगे, अनिल घाटगे, रत्नदीप चोपडे, सागर शिंदे यासह शहाजी तरुण मंडळ व शिवप्रेमी उत्तरेश्वर पेठ – शुक्रवार पेठेतील महिला भगिनी उपस्थित होत्या.