कोल्हापूर • प्रतिनिधी
संजय घोडावत विद्यापीठाच्या एमएस्सी फिजिक्स (पदार्थविज्ञान) शाखेचा विद्यार्थी शिवराज महाडिक याला दक्षिण कोरिया येथील नामवंत चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये पीएच.डी.साठी प्रवेश मिळाला आहे. चोन्नम नॅशनल विद्यापीठ हे दक्षिण कोरियातील राष्ट्रीय विद्यापीठांपैकी एक असून जगातील पहिल्या ५०० विद्यापीठामध्ये समावेश आहे. शिवराज महाडिक यास कोरियन गव्हर्नमेंटकडून पीएच.डीसाठी फेलोशिप मिळाली आहे. चोन्नम नॅशनल विद्यापीठ हे संशोधनासाठी जगप्रसिद्ध आहे.
दरम्यान, घोडावत विद्यापीठात शिवराज महाडिक याचा सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त विनायक भोसले, डॉ. एन. के. पाटील, डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी, डॉ. ए. डी. सावंत, डॉ. सरिता पाटील, डॉ. राणी पवार, प्रा.अतुल तेली आदी उपस्थित होते. विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. एन. के. पाटील, संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी शिवराज महाडिक याला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल बोलताना शिवराज महाडिक म्हणाला ”संजय घोडावत विद्यापीठातील पदार्थविज्ञान शाखेत मटेरियल सायन्सवरती संशोधन चालू आहे. माझ्या मार्गदर्शिका डॉ.सरिता पाटील यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करून माझ्यातील संशोधन अभिवृत्तीस चालना दिली. माझ्या या यशामध्ये माझे आईवडील, पदार्थविज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक यांचा मोलाचा वाटा आहे.”
घोडावत विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागांतर्गत बीएस्सी व एमएस्सी या पदवी अभ्यासक्रमातून शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर मटेरियल सायन्स व अवकाश विज्ञान या दोन्ही स्पेशलायझेशन मधून विद्यार्थ्यांना एमएस्सी व पीएच.डी शिक्षणाची संधी उपलब्ध आहे. या विभागामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व कौशल्य वाढीसाठी प्राध्यापक वृंद अविरत कष्ट घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी स्टाफकडून समुदेशन केले जाते. शिवराज यास पदार्थविज्ञान विभागाच्या विभागप्रमुख डॉ.सरिता पाटील, अवकाश वैज्ञानिक डॉ.दादा नाडे, डॉ.राणी पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-