कोल्हापूर • प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून १ ते ६ जूनपर्यंत कोरोना सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने मंगळवारी (दि.१) दुपारी १२ वाजता छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर महापालिकेच्या रुग्णालयातही सिरीन, सॅनिटायजर, हॅन्डग्लोज, मास्कचे वाटप करण्यात आले.
सीपीआरचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर करवते व आरोग्यदूत बंटी सावंत यांच्याकडे सॅनिटायजर मशीन, सॅनिटायजर, सिरीन, हॅन्डग्लोज, मास्क असे साहित्य वाटप मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, केमिस्ट असोसिएशनचे मदन पाटील यांचे हस्ते देण्यात आले. सीपीआरसह महापालिका रुग्णालयांतही आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बबनराव रानगे, विजय आगरवाल, उत्तम जाधव, कादरभाई मलबारी, बाबा महाडीक, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, मदन बागल, हेमंत घाग, महादेव पाटील, अवधूत पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
————————————–