शिवसेनेच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण राज्यभरासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे शिवसेनेच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी चौकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
      शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता समस्त शिवसैनिक ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन होऊन छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक अर्पण करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समस्त हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्यावतीने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “हर हर महादेव”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” घोषणा देण्यात आल्या.  फटाक्यांची आतिषबाजी करून सर्वांना साखर–पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
     यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पवार, माजी नगरसेवक राजू हुंबे, बजरंग दलचे बंडा साळुंखे, भाजपचे अशोक देसाई, शाम जोशी, संजय साडविलकर, उदय भोसले, अरुण सावंत, शिवसेनेचे जयवंत हारुगले, किशोर घाटगे, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, धनाजी दळवी, रमेश खाडे, रणजीत जाधव, सुनील खोत, अजित गायकवाड, राजू काझी, निलेश हंकारे, अंकुश निपाणीकर, युवासेना शहरप्रमुख चेतन शिंदे, पियुष चव्हाण, शैलेश साळोखे, दादू शिंदे, दिनेश चव्हाण, कपिल सरनाईक, श्री शहाजी तरुण मंडळाचे उदय शिंदे, सागर शिंदे, कपिल केसरकर, संजय केसरकर  यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————————–                                                 Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *