कोल्हापूर • प्रतिनिधी
कोरोना महामारीचे संकट राज्यावर घोंगावत असताना शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेच्यावतीने आज कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास (सीपीआर) ५० लाख रुपयांचे व्हेंटीलेटर प्रदान करण्यात आले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत पाच व्हेंटीलेटर सीपीआर प्रशासनाकडे प्रदान करण्यात आले. यावेळी कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक सेवा पुरवू, यासह सीपीआर रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन राजेश क्षीरसागर यांनी केले.
सीपीआरमध्ये कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सीमाभागातून रुग्ण दाखल होण्याची संख्या अधिक आहे. या रुग्णांना व्हेंटीलेटर बेडची आवश्यकता असल्याने सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून शिवसेनेच्यावतीने सीपीआर रुग्णालयास अत्यावश्यक अशी व्हेंटीलेटर आज प्रदान करण्यात आली. पुढील काळात अशाच पद्धतीने सीपीआर रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकरिता प्रयत्न करू, असे प्रतिपादन राजेश क्षीरसागर यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रभारी अधिष्ठाता डॉ.अजित लोकरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल माळी, डॉ.अनिता सैबनवार, डॉ.विजय बर्गे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, राहुल चव्हाण, अजित मोरे, राजू हुंबे, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना उपशहर प्रमुख जयवंत हारुगले, रमेश खाडे, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, किशोर घाटगे, पानपट्टीसेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत, फेरीवाले सेना शहरप्रमुख धनाजी दळवी, रहीम बागवान, अश्विन शेळके, निलेश हंकारे, रियाज बागवान, रणजीत मिणचेकर, सुनील करंबे, अंकुश निपाणीकर, साहिल बागवान, युवा सेनेचे योगेश चौगुले, कपिल सरनाईक, पियुष चव्हाण, कृष्णा लोंढे, उदय पोतदार सीपीआर प्रशासनाचे डॉ.महेंद्रकुमार बनसोडे, डॉ.वसंत देशमुख, डॉ.रविंद्र रामटेके, डॉ.सुनिता रामानंद, डॉ. अपराजित वालावलकर, डॉ. कुंभोजकर, डॉ. वासंती पाटील, डॉ. राहुल बडे, डॉ.सुजाता नामे, डॉ.कारंडे, डॉ.अनिता मांडरे, डॉ.स्वेनिल शहा, डॉ.गिरीश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.