पदवीधर आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा उद्या निर्धार मेळावा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
    पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने शनिवार दि.०७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता गुरुकृपा हॉल, आंबेवाडी, कोल्हापूर येथे पदाधिकारी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
     या मेळाव्याची नियोजन बैठक आज शिवसेना शहर कार्यालय येथे पार पडली.यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. पदवीधर निवडणुकीबाबत वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार प्रचाराची रणनिती ठरवली जाणार आहे. यासह महापालिकेच्या निवडणुकीत इच्छुक शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी, वैयक्तिक संपर्कावर भर देणे गरजेचे आहे. या दोन्ही निवडणुकीसंदर्भात दिशा ठरविण्यासाठी उद्या (शनिवारी) होणाऱ्या मेळाव्यास शहर शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. क्षीरसागर यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!