आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून नेमबाज अभिज्ञा पाटील हिचे कौतुक

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी नेमबाज अभिज्ञा पाटील हिने जागतिक नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक मिळविल्याबद्दल कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
     भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून नेहमीच विविध क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते. अनेक खेळाडूंना दादांच्या माध्यमातून सातत्याने मदत करण्यात येते. यातील बहुतांशी क्रीडापटू विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करून कोल्हापूरच्या नांवलौकिकात भर टाकत आहेत.
      नुकतीच नवी दिल्ली येथे जागतिक नेमबाज स्पर्धा पार पडली. यामध्ये कोल्हापूरची कन्या अभिज्ञा पाटील हिने रौप्य पदकाची कमाई केली. तिच्या या  यशाबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांनी वडगांव येथे अभिज्ञा पाटील हिच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अभिज्ञाच्या यशाबद्दल तिला प्रोत्साहन देणाऱ्या घरच्यांचेदेखिल कौतुक केले. कमी वयात अभिज्ञाने मिळवलेले यश लक्षात घेता या क्षेत्रात अभिज्ञाचे करिअर मोठे असून तिच्या पुढील वाटचालीमध्ये कायम तिच्या सोबत राहणार असल्याचे दादांनी सांगितले. तसेच आता मिळालेल्या यशामुळे आगामी स्पर्धांसाठी आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरुन ती लवकरच यापेक्षा मोठे यश संपादन करेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
     यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, जि.प सदस्य दलित मित्र डॉ. अशोकराव माने, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अशोक चौगुले, नगराध्यक्ष मोहन माळी, नाना जाधव, बंडा गोंदकर, जगन्नाथ माने, अभिज्ञाचे आई-वडिल प्रतिभा पाटील व अशोक पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!