• व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
कोल्हापूर • प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, सॅनिटाईझरचा वापर करणे व इतर अनुषंगीक नियमांचे पालन करावे असे आवाहन उप-आयुक्त निखिल मोरे यांनी केले. निवडणूक कार्यालय येथे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, कोल्हापूर कापड व्यापारी संघ, हॉटेल मालक संघ, कोल्हापूर इलेक्ट्रीक असोसिएशन, कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन, कोल्हापूर किरकोळ दुकानदार संघटना व इतर व्यापारी संघटना यांच्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.
उप-आयुक्त निखिल मोरे म्हणाले, सध्या राज्यात इतर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या वाढत्या रुग्णांची संख्या विचारात घेता कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून आतापासूनच काळजी घ्यावी लागेल. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. अनलॉक झाल्यानंतर शहरामध्ये सर्व ठिकाणी व्यवसाय सुरळीत सुरु झालेले आहेत. परंतु कोव्हिडबाबत घ्यावयाच्या दक्षतामध्ये सध्या शिथिलता आली असून दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मंगल कार्यालय, भाजी मार्केट याठिकाणी मास्क न वापरणे, वाहन चालवताना चेहऱ्यावर अर्धवट मास्क लावणे व गर्दी करुन सोशन डिस्टंन्सचे पालन न करणे अशा गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पुन्हा अनलॉक होऊ नये यासाठी नियमांचे पालन करुन सर्व व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. सध्या हॉटेलमध्ये व लग्न समारंभामध्ये गर्दीचे प्रमाण वाढत आहे. याठिकाणी ज्या नियमांच्या अधिन राहून परवानगी दिलेली आहे. त्याचे पालन होत नसलेचे निदर्शनास आलेले आहे. महापालिकेची पाच पथके जनजागृती करण्यासाठी व दंडात्मक कारवाई करण्यासाठी कार्यरत ठेवण्यात आलेली आहेत. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकांनामध्ये ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ असे बोर्ड लावावेत. सोशल डिस्टंन्सचे पालन करावे अशा सुचना केल्या.
यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे व मंगल कार्यालय असोसिएशनचे नितीन सावंत यांनी मते मांडली.
बैठकीस परवाना अधिक्षक राम काटकर, मुख्य अग्निशनम अधिकारी रणजित चिले, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे उज्वल नागेशकर, सिध्दार्थ लाटकर, सचिन शानभाग, सौ.गौरी इंगळे, अरुण चोपदार, कोल्हापूर इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अनिल धडाम, डी मार्टचे ऋषीकेश देवाडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे राहूल नष्टे, अजित कोठारी, जयंत गोयंका, मंगल कार्यालय असोसिएशनचे गणेश काटे, कैलास साळोखे, उमेश देसाई, प्रकाश कल्याणकर, शैलेश शिंदे, उदय इंगळे, कोल्हापूर कापड व्यापारी संघाचे संपत पाटील, कोल्हापूर किरकोळ दुकानदार असोसिएशनचे संदीप वीर, कुशल राक्षे, दिलीप पोवार, गोरख गुरव, राजेंद्र वाडकर आदी उपस्थित होते.
———————————————–