दुकाने, आस्थापना यांनी प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे: जिल्हाधिकारी

Spread the love


कोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)  
     कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांनी प्रतिबंधात्मक आदेशातील वेळांचे व क्षमतेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत.
     जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना, रेस्टॉरंट्स, सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलिंग, सर्व प्रकारचे खेळ, चित्रीकरण, बांधकाम, व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर्स, स्पा, वेलनेस सेंटर्स इ. यांना वेळांचे व ठरवून दिलेल्या क्षमतेचे काटेकोरपणे पालन होत नाही. तसेच लग्नसमारंभ, अंत्ययात्रा/अंत्यविधी, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सभा/ बैठका आदीना प्रतिबंधात्मक आदेशातील ठरवून दिलेल्या क्षमतेचे काटेकारेपणे पालन होत नाही.
      प्रशासकीय यंत्रणेने नागरिकांकडून वेळांचे व क्षमतेचे काटेकोरपणे पालन होत असल्याबाबतची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, आस्थापना यांच्यावर दंडात्मक/फौजदारी कारवाई करावी, अशा सूचना जिल्हादंडाधिकारी तथा कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!