खोटी माहिती दिल्याबद्दल दत्तकृपा हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस


कोल्हापूर • प्रतिनिधी
      रंकाळा स्टँड परिसरातील धोत्री गल्ली येथील दत्तकृपा हॉस्पिटलला महापालिकेने आज चुकीची माहिती दिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत दोन दिवसात लेखी खुलासा करण्याचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत.
      दत्तकृपा हॉस्पिटलमधील डॉक्टर यांनी महापालिका प्रशासक डॉ.बलकवडे यांना रात्री १०.३० वाजता हॉस्पिटलमध्ये सिलेंडर साठा शिल्लक असताना तो संपले असल्याचा फोन केला. याबाबत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी उपायुक्त निखील मोरे यांना तात्काळ सदर तक्रारीबाबत शहानिशा करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत उपायुक्त निखील मोरे यांनी या हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराशी संपर्क साधला असता, त्याने आज याठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा केली असल्याचे सांगितले. 
     यानंतर उपायुक्त निखील मोरे, सहायक आयुक्त संदीप घार्गे, अग्निशमन विभागाचे मनीष रणभिसे यांनी तात्काळ सदर हॉस्पिटलला रात्री ११.३० ला भेट दिली. यावेळी त्यांना या हॉस्पिटलमध्ये सिलेंडरच्या दहा टाक्या भरलेल्या असल्याचे आढळून आले. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या टाक्या शिल्लक असतानाही  डॉक्टरांनी रात्री चुकीची व खोटी माहिती दिली. त्यामुळे  दत्तकृपा हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *