युरेका डायग्नोस्टीक ॲण्ड रिसर्च सेंटरला कारणे दाखवा नोटीस

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी येथील युरेका डायग्नोस्टीक ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये एचआरसीटीसाठी जादा दर आकारल्याने सहा. आयुक्त चेतन कोंडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
      शहरामध्ये एचआरसीटीसाठी जादा दर आकारत असल्याच्या महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरातील डायग्नोस्टीक सेंटरची अचानक तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पाच वाजता उप-आयुक्त शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त विनायक औंधकर व चेतन कोंडे यांनी फोर्ड कॉर्नर येथील युरेका डायग्नोस्टीक ॲण्ड रिसर्च सेंटरला अचानक भेट देऊन तपासणी केली. 
      यावेळी याठिकाणी या सेंटरने रुग्णांकडून एचआरसीटीसाठी जादा दर आकारलेचे निदर्शनास आले. त्याचबरोबर डॉक्टरांच्या शिफारस पत्राशिवाय १० रुग्णांचे एचआरसीटी स्कॅन केले असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर कोवीड आणि नॉन कोवीड रुग्णांसाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था केलेली नव्हती. सेंटरमध्ये सोशल डिस्टंन्स पाळले जात नव्हते. सेंटरचा बाहेर कोणताही सुचना फलक लावलेला नव्हता. येणाऱ्या रुग्णांना व नागरिकांसाठी सॅनिटाईजर अंशत: केले जात असलेचे निदर्शनास आले. त्यामुळे रुग्णांची ही लूट व गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने ठरवून दिलेल्या दराचे उल्लंघन केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे. 
     याबाबत त्यांनी २४ तासाच्या आत खुलासा करणे बंधनकारक केले आहे. वेळेत खुलासा प्राप्त न झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम व कोवीड उपाययोजना नियमांअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!