गेट परीक्षेत श्रवण राजपुरोहित याचे राष्ट्रीय स्तरावर यश


कोल्हापूर • प्रतिनिधी
     भारतीय प्रोद्योगिकी संस्था मुंबई च्यावतीने फेब्रुवारी २०२१ मध्ये राष्ट्रीय पातळी घेण्यात आलेल्या गेट (GATE- 2021) या परीक्षेत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूरचा विद्यार्थी श्रवण राजपुरोहीत (अंतिम वर्ष बी फार्मसी) याने राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले.
     सदर परीक्षा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे फार्मसी व एम टेक प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. या यशस्वी विद्यार्थ्यास डॉ. एच. एन. मोरे, गेट समन्वयक डॉ. फिरोज ए. तांबोळी, वर्गशिक्षक प्रा. व्ही. टी. पवार व इतर शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
      श्रवण राजपुरोहित याचे भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, कुलपती भारती विद्यापीठ पुणेचे डॉ. शिवाजीराव कदम, मानद संचालक भारती विद्यापीठ विभागीय कार्यालय सांगली डॉ. एच. एम. कदम यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *