श्री अंबाबाईची ‘ महिषासूरमर्दिनी ‘ रूपात पूजा

Spread the love


  कोल्हापूर • प्रतिनिधी
      अश्र्विन शुद्ध अष्टमीला साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण‌‌‌पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मीची ‘ महिषासूरमर्दिनी ‘ रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा श्रीपूजक प्रसाद लाटकर व श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
   नवरात्रातील आठव्या माळेला अर्थात अष्टमीला देवीचा जागर असतो. त्या अनुषंगाने बांधण्यात आलेल्या या पूजेचा आशय असा , अष्टमीला आदिशक्ती श्री जगदंबेने विराट रूप धारण करून, घनघोर युद्ध करून महिषासूराचा वध केला.आपल्या प्रचंड शक्तीने मदोन्मत्त होऊन त्रैलोक्याला त्रास देणारा असूर आज संपला. ५१ शक्तीपीठांच्या यादीत करवीरसाठी येणारा ‘ करवीरे महिषमर्दिनी ‘ असा उल्लेख दृष्टीगोचर करणारी अशी ही आजची पूजा आहे.      

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!