श्री अंबाबाईची ‘ सरस्वतीरूप ‘ पूजा


कोल्हापूर • प्रतिनिधी
    नवरात्रातील सातव्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची अगस्त्यकृत सरस्वती स्तवनात वर्णन केल्याप्रमाणे ‘सरस्वतीरूप ‘ स्वरूपात पूजा बांधण्यात आली.
   श्रीपूजक पराग ठाणेकर व योगेश जोशी यांनी बांधलेल्या या पूजेचा आशय असा, करवीर महात्म्य हा कोल्हापूरचा क्षेत्रमहिमा सांगणारा ग्रंथ! हा ग्रंथ उलगडतो, तो अगस्ती व लोपामुद्रा या ॠषी दांपत्याच्या संवादातून. करवीरात एकेकाळी प्रचलित असलेल्या ‘ श्रीविद्या ‘ म्हणजेच श्रीयंत्र पूजा परंपरेत आजही आचार्य म्हणून प्रत्यक्ष महाविष्णूनी उल्लेख केला आहे, अशा अगस्त ॠषीनी पत्नी लोपामुद्रेसह करवीरच्या त्रिशक्तींचे म्हणजेच महाकाली, महासरस्वती व महालक्ष्मी यांचे दर्शन घेतले. तेव्हा त्यांचे तोंडून या त्रयमुर्तींची स्तुतीस्तोत्रे बाहेर प्रकटली. त्या स्तवनांपैकीच हे श्री महासरस्वतीचे स्तवन आहे. अशा अगस्त्यकृत सरस्वतीस्तवनात वर्णन केल्याप्रमाणे ‘ सरस्वतीरूप ‘ पूजा बांधली आ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *