श्री अंबाबाईचे ‘ पराशरांना महाविष्णुस्वरुपात दर्शन ‘


कोल्हापूर • प्रतिनिधी
    अश्र्विन शुद्ध द्वितीया तिथीला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची ‘ पराशरांना महाविष्णुस्वरुपात दर्शन ‘ अशा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. यंदाच्या नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनीचे करवीर महात्म्यातील निवडक स्तोत्रांमधून होणारे दर्शन ही पूजेसाठी संकल्पना राबवली आहे.
    साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी पारंपरिकपणे नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मीची ‘ महाशक्ती कुण्डलिनीस्वरुपा ‘ रूपात पूजा बांधण्यात आली. त्यानंतर द्वितियेला  श्री अंबाबाईचे ‘ पराशरांना महाविष्णुस्वरूपात दर्शन ‘ अशा रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा माधव मुनिश्वर व मकरंद मुनिश्वर यांनी बांधली.
    द्वितियेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई श्री पराशरांना महाविष्णुस्वरूपात दर्शन देताना विराजमान झाली आहे. याची पार्श्र्वभूमी अशी, श्री महालक्ष्मी जेव्हा घोर तप करणाऱ्या पराशरांना महाविष्णुस्वरूपात दर्शन देते तेव्हा त्यांचा सर्व संशय, भेदभाव फिटतो. ते महालक्ष्मीला विष्णूस्वरूपिणी जाणून तिच्यापुढे नतमस्तक होतात व सर्व संशय हरण करणाऱ्या अष्टकाने स्तुती करतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *