श्रीकृष्ण सरस्वती मंगल कार्यालय सील ; ५ हॉटेल व १२ मंगल कार्यालयांवर कारवाई

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      महानगरपालिकेच्या भरारी पथकाने रविवारी (दि.१८) बाबा जरगनगर येथील श्रीकृष्ण सरस्वती मंगल कार्यालय सील केले. प्रशासनाने घालून दिलेल्या मर्यादीत परवानगीपेक्षा जास्त लोक लग्नसंमारंभास उपस्थित असल्याने या ही कारवाई करण्यात आली. 
     मंगळवारपेठ, मंगेशकर नगर येथील अक्षय अरुण जाधव यांना श्रीकृष्ण सरस्वती मंगल कार्यालय येथे १२:१० च्या लग्नाचे कार्यक्रमास २५ जणांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आलेली होती. याठिकाणी दुपारी १:४५ वाजता महानगरपालिकेच्या भरारी पथकाकडून कार्यक्रमाचे ठिकाणी तपासणी केली असता लग्नकार्यास २५ पेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याचे पथकास आढळून आले. त्याचबरोबर कोविडच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्कचे नियम पाळले जात नसलेचे दिसून आले. त्यामुळे भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी अक्षय अरुण जाधव यांना कार्यालयातील लोकांनी सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर केला नसलेने रक्कम २००० रूपयेची दंडात्मक कारवाई केली. तसेच श्रीकृष्ण सरस्वती मंगल कार्यालयाचे मालक संजय प्रभाकर जरग यांना प्रशासनाने घालून दिलेला नियमांची माहिती होती. तरीही २५ लोकापेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याने मंडलीक वसाहत येथील वधुचे पिता विजय पोवार, वराचा भाऊ अक्षय जाधव व श्रीकृष्ण सरस्वती मंगल कार्यालयचे मालक संजय जरग यांचे विरुध्द रविावारी रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
       तसेच शहरातील ५ हॉटेल व १२ मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात आली.  शहरातील लग्न समारंभ आयोजीत केलेल्या ५ हॉटेलवर कारवाई करुन २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर १२ मंगल कार्यालयांवर विनामास्क व सोसशनडिस्नचे पालन न केलेले १३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यामध्ये थ्री लीव्हज, रेडीयंट, अयोध्या, वृषाली, २४केझ हॉटेलवर कारवाई करण्यात आली. तर  वृंदावन हॉल कार्यालय, श्री लॉन, सिद्विविनायक कार्यालय, शुभम हॉल, मांगल्य हॉल, सयाजी हॉल, ज्ञानदिप हॉल, महाराजा हॉल, स्वयंवर हॉल, दैवज्ञ हॉल, शिंदे हॉल व कल्याणी हॉल  येथे दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे मार्केट यार्ड येथील रसिका हॉटेलजवळ नियम न पाळता हळदीचा कार्यक्रम आयोजीत केलेले संबंधितांना चार हजार रुपये दंड करण्यात आला.
     उपमुख्य अग्निशामक तानाजी कवाळे, इस्टेट अधिकारी सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, आरोग्य निरिक्षक गिता लखन, राजेंद्र पाटील, दयानंद मोरे, दिलीप कदम यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!