बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज भोसलेची जेतेपदाची हॅट्ट्रिक

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     जानेवारी महिन्यात झालेल्या सलग तीन बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून रेंदाळच्या श्रीराज भोसलेने हॅट्ट्रिक साधली.
     बेनाडी चेस असोसिएशन बेनाडी व कोल्हापूर चेस अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि श्री काडसिद्धेश्वर शिक्षण संस्था,बेनाडी यांच्या सहकार्याने झालेल्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग बुद्धिबळपटू कै.शैलेश नेर्लीकर स्मृती खुल्या जलद एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेत रेंदाळच्या श्रीराज भोसलेने सात पैकी सात गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. त्याला रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. या अजिंक्यपदामुळे जानेवारी महिन्यात श्रीराजने सलग तीन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद पटकावून हॅट्रिक केली.
     बेनाडी येथील स्पर्धेत इचलकरंजीचा रविंद्र निकम उपविजेतेपद ठरला. तामिळनाडूचा आंतरराष्ट्रीय मास्टर आर. बालसुब्रमण्यम याला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. मिरजेचा मुदस्सर पटेलला चौथे स्थान व कोल्हापूरच्या अनिश गांधीला पाचवे स्थान मिळाले.
     स्पर्धेचे उदघाटन डॉ. अश्विनी माने-पाटील यांच्या हस्ते झाले. बक्षीस समारंभ शैलेशच्या आई सौ.सरला नेर्लीकर व निपाणी पोलीस स्टेशनचे हेड शिवानंद सारवदे, सुरज पाटील, भरत पाटोळे व सुनिल शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
   अन्य बक्षीस विजेते पुढीलप्रमाणे ६)कौस्तुभ गोते, इचलकरंजी ७)सोहम खासबारदार, कोल्हापूर ८)शर्विल पाटील, कोल्हापूर ९)आदित्य सावळकर, कोल्हापूर १०)प्रणव पाटील कोल्हापूर ११)अभिषेक पाटील, मिरज १२) प्रदीप आवडे, सातारा १३) अनिकेत बापट, सातारा १४) संतोष नडगदल्ली, संकेश्वर १५)राहुल सामानगडकर, इचलकरंजी.
    आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, बेनाडी चेस असोसिएशनचे अध्यक्ष सुरज पाटील व सौ. सरला नेर्लीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत मुख्य पंच मनीष मारुलकर, जयश्री पाटील व आरती मोदी यांनी पंच म्हणून काम पाहीले.
     स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे, सागर चौगुले, तानाजी गुरव, नंदकुमार बाचलकर, विश्वास पाटील, पुष्पराज पाटील व प्रतिक शहा यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!