लसीकरण मोहिमेत गोव्याची लक्षणीय कामगिरी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

• प्रमोद सावंत यांनी कू वर पोस्ट करत व्यक्त केल्या भावना
पणजी :
     भारतासह जगभरात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहिम राबवली जाते आहे. गोव्याने याबाबत एक लक्षणीय कामगिरी केली आहे. दहा हजारपेक्षा जास्त गोवन नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कू वर पोस्ट करत त्यायाठी गोव्यातील नागरिक आणि प्रशासनाचे कौतुक केले आहे.
      कू वर पोस्ट करताना त्यांनी लिहिले आहे, “मला हे सांगताना अतिशय आनंद होतो आहे, की आमच्या गोवा राज्याने अजून एक मैलाचा दगड ओलांडला आहे. तो म्हणजे, गोव्यात दहा हजारांहून अधिक नागरिकांनी दोन लसींचे डोस पूर्ण केले आहेत. हे अतिशय मोलाचे काम डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊच शकले नसते. या सगळ्यांनी न थकता अखंड काम केल्यानेच हे घडू शकले. आता हाच वेग कायम ठेवत लवकरच गोवा पूर्णत: लसीकरण झालेले राज्य बनेल.”
      श्री.सावंत यांनी दिलेल्या आकड्यानुसार आतापर्यंत गोव्यात एकूण १०,०४,९१० लोकांचे दोन्ही कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. ‘गोव्याच्या लसीकरण मोहिमेतला नवा मैलाचा दगड’ असे सावंत यांनी कू वर पोस्ट करताना म्हटले आहे.  
      दरम्यान, केंद्र सरकारने कोरोना टेस्टिंग वाढवण्याबाबत काही राज्यांना आवाहन केले आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी काही राज्यांना पत्र पाठवले आहे. या राज्यांमध्ये नागालॅंड, सिक्कीम, मेघालय, मणिपूर, जम्मू आणि काश्मिर, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि लद्दाखसह महाराष्ट्र आणि गोव्याचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *