सिमंधरधाम जैन ट्रस्टचा महामार्गावरील प्रवाशांना मदतीचा हात

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिरोली येथील सिमंधरधाम जैन ट्रस्टतर्फे गेले चार दिवस पुरामुळे महामार्गावर अडकून पडलेले १३० प्रवासी तसेच राखीव पोलीस दलाचे ११० जवान यांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे.
     महामार्गावरील पुलावर आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारी अनेक वाहने रस्त्यावर अडकून पडली. या कुटुंबाना ताबडतोब आसरा देण्याचे कार्य सिमंधरधाम जैन ट्रस्टचा पदाधिकार्‍यांनी केले.
     या प्रवाशांना राहण्यासह सकाळचा नाष्टा, दुपारचा चहा व दोन वेळचे जेवण अशी सर्व व्यवस्था जैन ट्रस्टतर्फे करण्यात आली. त्याचबरोबर राज्य राखीव पोलीस दलाचे ११० जवानांचीही गेली चार दिवस याठीकाणी निवास व भोजनाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली.
     सिमंधरधाम ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप गांधी, उपाध्यक्ष सुरेश राठोड व अन्य पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक दिनेशभाई व अन्य कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!