![]() | ![]() ![]() ![]() ![]() | ||
• शहराध्यक्ष आर.के. पोवार यांच्या हस्ते ध्वजारोहण
कोल्हापूर • प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२ वा वर्धापनदिन आज कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर कार्यालय शिवाजी स्टेडियम येथे साधेपणाने पण उत्साहाने साजरा करण्यात आला. कोविड-१९ महामारीमुळे विविध कार्यक्रम रद्द करून फक्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या हस्ते सकाळी १०:१० वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आर. के. पोवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर मी या पक्षाचे काम करीत आहे. गेली १७ वर्षे मी कोल्हापूर शहरात पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. मी याबाबत समाधानी आहे. शहरात राष्ट्रवादी पक्ष रुजवण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. जनतेत या पक्षाची स्वच्छ प्रतिमा व विश्वास याच्या जीवावर गेल्या २२ वर्षात १७ वर्षे पक्ष मित्रपक्षांसह सत्तेत आहे. अशा पक्षाचे मी काम करतो आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आज मराठा आरक्षण प्रश्न निर्माण झाला आहे. बरेच लोक व पत्रकार मला पक्षाची भूमिका विचारतात. त्यांना माझे एकच उत्तर आहे, इतर आरक्षण आहे तसेच ठेवून मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. तो कायम राहील याची ग्वाही देतो.
वर्धापन दिनानिमित्त शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या हस्ते केक कापण्याचा आला. कार्यक्रमाचे स्वागत सरचिटणीस सुनील देसाई यांनी केले तर आभार सुभाष साळोखे यांनी मानले. यावेळी सुनील पाटील, महेंद्र चव्हाण, जहिदा मुजावर, रमेश पोवार, प्रसाद उगवे, लालासो जगताप, निरंजन कदम, रामराजे बदाले, रियाज कागदी, निशिकांत सरनाईक, महादेव पाटील, श्री. बागडी, सुनील जाधव, नितीन पाटील, सलीम मुल्ला, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, शितल तिवडे, सुमन वाडेकर, सोहेल बागवान, राजेंद्र पाटील, गणेश चव्हाण, दत्ता खोपडे, सुनील जाधव, नितीन मस्के, नागेश जाधव, बी. के. भास्कर, मंगल कट्टी, शारदा चेट्टी, रेहना नागरकट्टी, संजय पडवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते