सिद्धांत हॉस्पिटलच्या लुबाडणूकीस बळी पडलेल्या रुग्णांनी, नातेवाईकांनी शिवसेनेशी संपर्क साधावा : राजेश क्षीरसागर


कोल्हापूर • प्रतिनिधी 
     डॉ. कौस्तुभ वाईकर यांच्या सिध्दांत हॉस्पिटलच्या लुबाडणूकीस बळी पडलेल्या रूग्ण व नातेवाईक यांनी शिवसेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
     कोल्हापूर शहरातील रिंग रोड येथील सिद्धांत हॉस्पिटलकडून रुग्णांची आर्थिक फसवणूक तसेच चुकीचे उपचार केले जात असल्याच्या अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या तक्रारी येत आहेत.या रुग्णालयाचे डॉ.कौस्तुभ वाईकर आणि सौ.अनुष्का वाईकर यांच्या चुकीच्या उपचारामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा आहे. डॉ.वाईकर यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त असून त्यांचेकडे न्युरोसर्जन ही पदवी नसताना त्यांनी न्युरोसर्जरी करून अनेक रुग्णांचे नाहक बळी घेतले आहेत. गतवर्षीच्या आणि यावर्षीच्या कोव्हीड काळातही त्यांच्यावर आर्थिक लुबाडणूक केल्याच्या तक्रारी आहेत. डॉ.वाईकर या वादग्रस्त डॉक्टरमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा बदनाम होत आहे. डॉ. वाईकर यांच्या विरोधात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे देखील तक्रारी दाखल झाल्या असून, त्यावर कामकाज सुरु आहे.
     सिद्धांत हॉस्पिटलकडून आर्थिक लुबाडणूक झालेल्या सर्व रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना माझे आवाहन आहे कि,आपण सर्वांनी निर्भयपणे डॉ.कौस्तुभ वाईकर आणि सौ.अनुष्का वाईकर यांच्या विरोधात पुढे येऊन सोमवार दि.३१ मे २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत शिवसेना कोल्हापूर शहर कार्यालय,शनिवार पेठ,कोल्हापूर येथे तक्रारी दाखल कराव्यात. जेणेकरून कौस्तुभ वाईकर आणि सौ.अनुष्का वाईकर यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून सदर रुग्णालयाचे शासनाकडून लेखापरीक्षण (ऑडीट) करून आर्थिक लुबाडणूक झालेल्या रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना रक्कम परत मिळवून देता येईल, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
———————————————– ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *