स्कोडा स्लाव्हिया: इंडिया 2.0 प्रोजेक्टमधील दुसऱ्या स्कोडा मॉडेलचे पदार्पण

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
      ‘स्लाव्हिया’च्या सादरीकरणासह स्कोडा इंडियाच्या इंडिया 2.0 प्रोजेक्टच्या आगामी टप्प्याचा प्रारंभ झाला आहे. मध्यम आकाराच्या एसयुव्ही कुशकच्या लॉन्चनंतर यशस्वी पदार्पण करणारी नवीनकोरी सेदान झेक कारनिर्मितीकर्त्यांचे दुसरे इंडिया-स्पेसिफिक मॉडेल आहे.
     स्लाव्हियाच्या निर्मिती प्रक्रियेत ९५ टक्के पर्यंतची लोकलायजेशन स्तर आहे. ही सेदान एमक्यूबी-ए0-इन मंचावर आधारित असून एमक्यूबी वेरीएंट खासकरून भारतासाठी स्कोडा इंडियाने स्वीकारला आहे. हे वाहन सुरक्षित वैशिष्ट्यांची सर्वसमावेशक श्रेणी आणि प्रगत इन्फोटेनमेंट यंत्रणा उपलब्ध करून देते. स्लाव्हियाचे टीएसआय इंजिन अनुक्रमे ८५ केडब्ल्यू (११५ पीएस) आणि ११० केडब्ल्यू (१५० पीएस) याप्रमाणे आहे आणि कोणत्याही इतर स्कोडा मॉडेलप्रमाणे भावनेचा स्पर्श असणारे डिझाईन हे एक वैशिष्ट्य म्हटले पाहिजे.
     स्कोडा ऑटोचे सीईओ थॉमस शाफर म्हणाले की, नवीन स्लाव्हियासह आम्ही आमच्या इंडिया 2.0 प्रोडक्ट कॅम्पेनच्या पुढच्या टप्प्याचा प्रारंभ करत आहोत. कुशकच्या यशस्वी लॉन्चसह आम्ही आता आमच्या नव्याकोऱ्या आलिशान मध्यम आकाराच्या सेदानसह आणखी लोकप्रिय सेगमेंटमध्ये प्रवेश करत आहोत. स्लाव्हियाची निर्मिती आमच्या भारतामधील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सुयोग्य पद्धतीने केली आहे.
    स्कोडा ऑटो फॉक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गुरप्रताप बोपराय म्हणाले की, कुशकसोबत आम्ही इंडिया 2.0 प्रोजेक्टची यशस्वी सुरुवात केली. भारतात वैश्विक भागीदारीत आम्ही जे कमावले त्याची ही ठळक वैशिष्ट्ये म्हटली पाहिजे. त्याशिवाय एसयुव्हीच्या वाढत्या मागणीनंतर आलिशान सेदानमध्ये अद्वितीय क्षमता देऊ करण्यात येतात आणि हा दबदबा आम्ही स्वत:हून निर्माण केला आहे. स्लाव्हिया नजाकतीने परिपूर्ण असून त्यात प्रतिष्ठा व स्टाईलचा मिलाफ आहे. स्कोडा ऑटोच्या नवीन वृद्धी युगाचा हा आरंभ आहे. नजाकती सोबतच सर्वोत्तम क्षमतेचे इंजिन आणि अनेक सिम्पली क्लेव्हर वैशिष्ट्यांसह स्लाव्हिया भारतातील ग्राहकांना लक्षवेधी उत्पादन घेऊन आली आहे. जगभरातील बाजारपेठेत तिचे कौतुक झाले.
     स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर झॅक होल्लीस म्हणाले की, कुशकच्या लॉन्चसोबत आम्ही स्कोडा ऑटो इंडियात अभूतपूर्व वृद्धीचा अनुभव केला. कुशकने मध्यम आकाराच्या एसयुव्ही समवेत नवीन प्रदेश काबीज करत, आधुनिक भारताच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतिनिधित्व केले. स्लाव्हियाच्या रूपाने एक ब्रँड म्हणून भारताची अस्सल आलिशान सेदान उपलब्ध करून देत आम्हाला आमच्या मुळाकडे परतून आणले. वाहन उद्योगाने फटके सहन करूनही आम्ही आमची प्रोडक्ट कॅम्पेन सुरू ठेवली. आमचे नेटवर्क 100 हून अधिक शहरांपर्यंत विस्तारत गेले. ब्रँड जागरूकतेला चालना मिळाली, ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवण्याचे आमचे वचन जपले गेले, व्यावसायिक विक्रेत्यांचे जाळे, मूल्यवर्धित सेवा सादर करण्यात आली आणि विक्री-पश्चात व्यवसायानंतर नवीन मापदंड निर्माण करण्यात आला. स्लाव्हिया आतून बाहेरून देखणी आहे आणि कुशक समवेत हा आमचा दुसरा व्हॉल्यूम ड्रायव्हर (आकारमानाला चालना देणारा घटक) आहे, कारण आम्ही भारतामधील आकारमानात महत्त्वाची वृद्धी कायम ठेवली आहे.
                           स्कोडा स्लाव्हिया ……
      स्कोडा स्लाव्हिया आतून बाहेरून देखणी आहे. रुबाबदार बांधणीसोबत स्कोडाने सुस्थापित भावनाशील भाषा तयार केली आहे. स्लाव्हियाने सेदानचे नवीन वैशिष्ट्य अधोरेखित केले आहे. हे वाहन १७५२ एमएम रुंद असून सेगमेंटमधील विस्तृत ऑफर देते आणि पाच लोकांसाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून देते. या वाहनात ५२१ लिटर्सची विस्तारित बूटस्पेस आहे. प्रगत एलईडी तंत्रज्ञानासमवेत पुढचे हेडलाईट आणि टेललाईट प्रगत एलईडी तंत्रज्ञानासह उपलब्ध झाली आहे, त्यात स्कोडाचे सरधोपट क्रायस्टेलाईन डिटेल आहे. क्रोम-प्लेटेड डिझाईन आरेखन, टू-टोन अलॉय व्हील आणि विशेष स्कोडा बॅच यामुळे स्लाव्हियाला उच्च-गुणवत्तापूर्ण ‘फिल’ आहे. याचे नवीन मेटॅलिक क्रिस्टल ब्ल्यू आणि टोरनाडो रेड पेनवर्क भारतीय बाजारांत स्कोडाने खासकरून दाखल केले आहे.
      सध्याच्या स्कोडा मॉडेल्समध्ये अंतर्गत जागेतील मध्यभागी फ्री-स्टँडींग इन्फोटेनमेन्ट डिस्प्ले आहे. नव्या स्कोडा स्लाव्हियाच्या केबिनमधील हा सर्वात उठून दिसणारा घटक आहे. खाली असणारी २५.४ सेंटीमीटरची टचस्क्रीन ही स्कोडा ग्रीलच्या चौकटीला अधोरेखित करते. डिस्प्लेचा वापर करताना हाताला आधार देण्यासाठी देखील याचा वापर करता येतो. ब्रँडची ओळख असलेले प्रशस्त केबिन हे विरुद्ध रंगांच्या समांतर ट्रीम स्ट्रिपमुळे उठून दिसते. सर्व बाजूंना असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गोलाकार एअर व्हेन्ट्सपर्यंत ते विस्तारलेले आहे. टू-स्पोक मल्टीफंक्शन स्टीअरिंग व्हीलच्या मागे डिजिटल इन्स्ट्रुमेन्ट क्लस्टर डिस्प्ले देण्यात आला आहे. आडव्या, विरुद्ध रंगी सजावटीच्या स्ट्रीप प्रशस्त इंटीरियरला चालना देते आणि गोलाकार साईड एअर वेन्टसला जोडते.
——————————————————-
 Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!