कोल्हापूर • प्रतिनिधी
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक) व शिरगावकर ग्रुप यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस कल्याण निधीसाठी सोमवारी ६००० एन९५ मास्क व ३००० हून अधिक सॅनिटायझर बॉटल्स देण्यात आल्या.
सध्याच्या सलग लाॅकडाऊनमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांच्यावर पडणारा अतिरिक्त ताण व उपलब्ध व्यवस्था यावर मात करण्याकरिता पोलीस प्रशासनाकडून बऱ्याच सामाजिक संस्थाना विविध बाबींकरिता सामाजिक बांधिलकी म्हणून आवाहन केले गेले. याला प्रतिसाद देत स्मॅक व शिरगावकर ग्रुप यांच्याकडून जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस कल्याण निधीसाठी ६००० एन९५ मास्क व ३००० हून अधिक सॅनिटायझर बॉटल्स देण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडे मास्क व सॅनिटायझर बॉटल्स सुपूर्द करण्यात आले.
यावेळी स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष दीपक पाटील, ऑ. सेक्रेटरी जयदीप चौगले, शिरगावकर ग्रुपचे सचिन शिरगावकर व सोहन शिरगावकर (स्मॅक संचालक), शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, पोलीस कल्याण निधीचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमाशे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक शशीराज पाटोळे आदी उपस्थित होते.
———————————————–