कृष्णराज महाडिक यांनी जपली सामाजिक बांधिलकी

Spread the love

• पावसामुळे कोसळलेले गरीब महिलेचे घर पुन्हा बांधून दिले
कोल्हापूर • प्रतिनिधी
     ऊन, वारा, पावसापासून बचाव करत उभे राहिलेले वर्षानुवर्षाचे जुने घर मुसळधार पावसामुळे कोसळले आणि अगोदरच खाईत सापडलेल्या त्या माऊलीवर जणू आभाळच कोसळले. दोन खोल्यांचे घर, त्यात गुडघाभर चिखल, अर्ध छत कोसळलेले, उर्वरीत कधी कोसळेल याचा नेम नाही, अशा अवस्थेत हताश आणि निराश झालेल्या त्या माऊलीला आधार दिला तो कृष्णराज महाडिक यांनी.
     कोल्हापुरातील उजळाईवाडी जकात नाक्याजवळ राहणार्‍या मंगल कानडे या महिलेचे पावसामुळे कोसळलेले घर पुन्हा बांधून देवून, कृष्णराज महाडिक यांनी सामाजिक बांधिलकी आणि दातृत्वाची परंपरा कायम राखली.
     मागील महिन्यात आलेल्या जोरदार पावसाने अनेकांच्या घरादाराचे मोठे नुकसान झाले. कोटयवधी रूपयांचे नुकसान झाले. या तडाख्यात अनेक गोरगरीबही सापडले. कोल्हापुरातील उजळाईवाडी येथील शाहू जकात नाक्याजवळ राहणार्‍या मंगल कानडे या महिलेचे जेमतेम दोन खोल्यांचे जुने घर, मोलमजुरी करून, मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरणार्‍या मंंगल कानडे यांच्यावर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडयात जणू आकाश कोसळले. मुसळधार पावसामुळे कानडे यांच्या घराचे छत कोसळले आणि त्यांनी उभा केलेला किडूक मिडूक संसारही अक्षरशः पाण्यातून वाहून गेला. घरामध्ये गुडघाभर चिखल झाला, दारिद्रयाने अगोदरच पिचलेल्या कानडे यांच्या घराची दुर्दशा पाहून अनेकजण हळहळले. कानडे यांच्या डोळयातील अश्रुंच्या धाराही थांबत नव्हत्या. घरात अन्नधान्याचा कण नाही, डोक्यावर छप्पर नाही, अशा अवस्थेत हताश झालेल्या मंगल कानडे यांच्या मदतीसाठी कृष्णराज महाडिक धावून गेले. त्यांनी स्वखर्चाने ८ दिवसात मंगल कानडे यांचे घर पुन्हा बांधून दिले आणि त्यांच्या हक्काचा निवारा त्यांच्याकडे सुपुर्द केला.
     नैसर्गिक किंवा मानवी आपत्तीमध्ये समाजाच्या मदतीसाठी धावून जाण्याची महाडिक घराण्याची परंपरा आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवत, समाजसेवेच्या कार्यात आणखी एक अध्याय यानिमित्ताने जोडला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!