समाजसेवा हेच शासकीय सेवेचे उद्दिष्ट: विकास खारगे

Spread the love


  कोल्हापूर • प्रतिनिधी
     समाजसेवा हेच शासकीय सेवेचे प्रथम व अंतिम उद्दिष्ट असते; असले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव विकास खारगे यांनी मंगळवारी येथे केले.
     शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने मंगळवारी (दि. २१) ऑनलाईन पध्द्तीने ‘स्पर्धा परीक्षांसाठीची तयारी’ या चार दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेस सुरूवात झाली. त्यावेळी श्री. खारगे बोलत होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.
     श्री. खारगे म्हणाले, स्पर्धा परीक्षांच्या तयारीची सुरूवात शालेय जीवनापासूनच करावी लागते. शासकीय सेवेसाठी स्पर्धा परीक्षा महत्त्वपूर्ण असतात. त्यासाठी मुळातूनच आवड असणे गरजेचे आहे. परीक्षेची तयार करताना यश-अपयशाचा विचार न करता स्वयंअध्ययनावर भर द्यावा. चांगल्या लेखकांची पुस्तके वाचावीत. या काळात विद्यार्थ्यांना कुटुंबियांकडून मानसिक आधाराची गरज महत्वाची असते.
     प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना विविध परीक्षांची तयारी करावी लागते. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी पूर्ण यश मिळविण्यासाठी अविश्रांत प्रयत्न केले पाहिजेत.
     अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, सध्याच्या ऑनलाईन युगामध्ये वावरताना शिवाजी विद्यापीठाचे विविध उपक्रम राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत विस्तारायला हवेत. त्याचा लाभ सर्वदूर पसरलेल्या विद्यार्थी वर्गाला व्हायला हवा. उत्तम नियोजन आणि कठोर परिश्रमाने विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेस सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
     केंद्राचे समन्वयक डॉ.पी.एस.कांबळे यांनी प्रास्ताविक केले, तर अजय कुंभार यांनी आभार मानले.
——————————————————-

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!