जिल्हा निवड खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सोहम खासबारदार अजिंक्य

Spread the love

• प्रणव पाटील उपविजेता; अन्य तिघे राखीव खेळाडू
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित सोहम खासबागदारने साडेचार गुणांसह अजिंक्यपद पटकाविले. द्वितीय मानांकित प्रणव पाटीलनेही साडेचार गुण मिळवत उपविजेतेपद पटकाविले. दोघांचे समान साडेचार गुण झाल्यामुळे सरस टायब्रेकरमध्ये पंधरा बक्खोल्झ गुण आधारे सोहमने अजिंक्यपद पटकावले तर साडेतेरा बक्खोल्झ गुण मिळवत प्रणवला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
    सोहम व प्रणव यांची पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली असून हे दोघे कोल्हापूर जिल्ह्याचे अधिकृत प्रतिनिधित्व करतील.
     वरद आठल्येचा तिसरा क्रमांक, आयुष महाजनचा चौथा क्रमांक तर सारंग पाटीलचा पाचवा क्रमांक आला. या तिघांना राखीव खेळाडू म्हणून निवडले.
     स्पर्धेच्या बक्षीस समारंभ क्रीडाधिकारी बालाजी बरबडे व सुधाकर जमादार यांच्या हस्ते झाला. यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे, मुख्य पंच मनीष मारुलकर व निहाल मुल्ला  उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!