मंत्री मुश्रीफांकडून लोककल्याणाचे कार्य अजूनही बाकी: संजय घाटगे


         
• भडगावात हनुमान मंदिर भूमिपूजन, मरगुबाई मंदिर वास्तुशांती व विकासकामांची उद्घाटने
 कोल्हापूर • प्रतिनिधी
     ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजकीय वारसा नसतानाही कर्तृत्वाच्या जोरावर  जनतेला आपलंसं केलं. त्यांच्या हातून अजूनही लोककल्याणाचं बरंच कार्य बाकी आहे, अशी अपेक्षा माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी व्यक्त केली.
     भडगाव (ता. कागल) येथे ग्रामदैवत हनुमान मंदिर भूमिपूजन, मरगुबाई मंदिर वास्तुशांती व विकासकामांची उद्घाटने अशा संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. 
       यावेळी श्री. घाटगे पुढे म्हणाले, अल्पसंख्यांक समाजात जन्मूनही केवळ लोकसेवेचे व्रत घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी बहुजन समाजाला आपलंस करून नेतृत्व केलं. राजसत्तेच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे दुःख, दारिद्र्य, अंधश्रद्धा, गरिबी यावर मात केली, गोरगरिबांचे अश्रू पुसले आहेत.
      ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जनतेने मला एवढे भरभरून दिलं आहे की या जन्मीच काय, सात जन्मीसुद्धा जनतेच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही.  विकासकामांच्या माध्यमातून मी जनतेचा पांग फेडीन.
      यावेळी मरगूबाई मंदिर वास्तुशांती, ग्रामदैवत हनुमान मंदिर भूमीपूजन, अंगणवाडी इमारत उद्घाटन, नवीन फिल्टर हाऊस उध्दघाटन, गावातील अंतर्गत रस्ते व  गटर्स, हनुमान मंदिरसमोर पेव्हिंग, हायमास्ट पोल उभारणी, माळवाडी रस्ता डांबरीकरण, पाणवठा रस्ता खडीकरण डांबरीकरण, भडगाव ते भडगाव फाटा रस्ता डांबरीकरण अशा एकूण दीड कोटी  रूपयांच्या कामांचा  लोकार्पण   मान्यवरांच्या हस्ते झाले.  
      यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, एम. एस. पाटील, सरपंच दिलीप चौगले, उपसरपंच बी.एम. पाटील, ज्ञानदेव म्हांगोरे, दत्तात्रय सोनाळकर, देवानंद पाटील, बाबासो चौगले,  समाधान राणे, रघुनाथ पाटील, मधुकर कांबळे, भिकाजी माने, एकनाथ पाटील, धोंडीराम भांडवले, विश्वनाथ खतकर, पांडूरंग चौगले, रणजित खतकर  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार विठ्ठल कुंभार यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *