कोल्हापूरचा सुपूत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता


कोल्हापूर • प्रतिनिधी
     येथील बुधवार पेठेतील आकाश रैनाक हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता या पदावर काम करत आहेत. त्यांचे संपुर्ण शिक्षण कोल्हापूर शहरातच झाले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयातच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करुन ते २०२० साली बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत झाले आहेत. 
     आज महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी आकाश रैनाक यांनी कोल्हापूर शहरात उद्भवलेल्या महापूराच्या कालावधीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत माझ्या जन्मभूमीतच मला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो. महापूराच्या कालावधीमध्ये महापालिकेडून मला व आमच्या कर्मचाऱ्यांना चांगले सहकार्य लाभले. येथून पुढेही कोल्हापूर महानगरपालिकेस कोणतेही सहकार्य लागलेस बृहन्मुंबई महानगरपालिका सदैव कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करण्यास तयार राहिल अशी ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *