सौ. बिरेन्द्र अडसुळे नॅशनल ॲकॅडमीच्या खेळाडूंचा सत्कार

Spread the love


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गडहिंग्लज येथील सौ. बिरेंद्र सहदेव अडसुळे नॅशनल ॲकॅडमीच्या खेळाडूंचा सत्कार झाला. गडहिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
      यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज शहराला शिक्षण, व्यापार, साहित्य व सांस्कृतिक यासह  खेळाचीही उत्कृष्ट परंपरा आहे. या खेळाडूंनी मिळवलेले दैदिप्यमान यश अभिमानास्पद आहे.
      ॲकॅडमीच्या मुख्य प्रशिक्षक सौ. बिरेन्द्र सहदेव अडसुळे म्हणाल्या,  गडहिंग्लज शहरासह विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडूंना विकसित करण्याच्या दृष्टीने आम्ही या ॲकॅडमीची स्थापना केली. या खेळाडूंना जर योग्य सुविधा उपलब्ध झाल्या तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू  तयार होतील, अशी आशा आहे.
      यावेळी गडहिंग्लज शहरासह कडगाव-कौलगे जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
          सत्कार झालेले खेळाडू …..
     दोन हजार मीटर धावणेमध्ये राष्ट्रीय ब्रॉंझपदक विजेती व खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झालेली गायत्री मलगोंडा पाटील, तसेच २०० मीटर राज्य स्पर्धेची विजेती सुकन्या आप्पा शिवणे या खेळाडूंसह पायल अरुण मोरे, रोहन केसरकर, भक्ती पोटे, प्रज्ञा शिंदे, जानवी अरुण मोरे या खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!