• ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्यावतीने ७ मार्चपासून कॅम्प
कोल्हापूर • प्रतिनिधी
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्यावतीने कोल्हापुरातील १२ ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी विशेष गोलकिपर ट्रेनिंग कॅम्प ७ मार्चपासून छत्रपती शाहू स्टेडियम व पोलो ग्राऊंड येथे आयोजित केला जाणार आहे.
या प्रशिक्षण वर्गासाठी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन यांनी प्रशिक्षित केलेले गोलकिपरचे प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापुरात अशा प्रकारचे गोलकिपरचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण लहान खेळाडूंना उत्तेजन व मार्गदर्शन देण्यासाठी प्रथमच होत आहे. सदरचा कॅम्प ७ ते १२ मार्च २०२२ या कालावधीत होणार आहे. तरी इच्छूक असणाऱ्या मुला-मुलींनी आपली नांवे केएसए कार्यालयात जन्मदाखलासह नोंदवावीत.
सदरचा विशेष गोलकिपर ट्रेनिंग कॅम्प कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए)चे अध्यक्ष व विफाचे उपाध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या महिला समिती सदस्य व विफाच्या महिला फुटबॉल समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या विशेष प्रयत्नातून प्रथमच होणार आहे.
अधिक माहितीसाठी केएसए कार्यालय (फोन नंबर ०२३१-२६४१७६३) येथे संपर्क साधावा.
——————————————————-