कोविड लसीकरण कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

• ४०० हून अधिक नागरिकांनी घेतली लस
कोल्हापूर • प्रतिनिधी
     १८ वर्षावरील नागरिकांना लस बुकिंग करण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्ष्यात घेऊन माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांच्या पुढाकाराने आणि ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या सहकार्याने नुकताच सशुल्क कोविड लसीकरण कॅम्प घेण्यात आला. धैर्यप्रसाद मंगल कार्यालय येथे आयोजित या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ४०० हून अधिक युवक-युवती व नागरिकांनी सहभाग घेऊन लस घेतली.
     श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि आमदार जयंत आसगावकर, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, नरेश चंदवाणी, अमर गांधी, तेज घाटगे, जयेश कदम, शाम कोरगावकर, राजू निकम, राजीव लिंग्रस, अशोक रामचंदानी, प्रणील इंगळे, गौरव खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या लसीकरण कॅम्पचा  शुभारंभ झाला.
     कोविड लसची असलेली टंचाई लक्षात घेऊन माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनी सशुल्क कोविड लसीकरण कॅम्प घेण्याचे ठरविले. मागील ५ ते ६ दिवसांपासून कॅम्पची तयारी सुरु होती. सोशल मीडियाद्वारे नागरिकांना पैसे भरून रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत ताराबाई पार्क व कोल्हापूर शहरातील १८+ (पहिला डोस) व दुसरा डोस (पहिली लस घेऊन ८४ दिवस झालेले) अशा ४०० युवक-युवती व नागरिकांनी लस घेतली. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र रजिस्ट्रेशन काऊंटर, बुकिंग काऊंटर आणि लसीकरण काऊंटर यांची व्यवस्था करण्यात आली होती. सोशल डिस्टन्सचे पालन करत लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे आलेल्या लोकांसाठी मिनरल वॉटर, चहा, बिस्कीट याची व्यवस्था करण्यात आली होती.
     या लसीकरण मोहिमेसाठी ऋतुराज इंगळे व त्यांचा परिवार, ॲस्टर आधार हॉस्पिटलचे डॉक्टर व टीम तसेच मित्र परिवार आणि सहकारी यांचे सहकार्य लाभले. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!