जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या मान्यताने दि.वि.फाउंडेशनच्या अंतर्गत आज कै.दिनकर विठ्ठल वडणगेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले.
     या स्पर्धेत पेटवडगाव, उंचगाव, कळंबा, शिरोली, गांधीनगर, वळीवडे आणि कोल्हापूर शहरातील विविध शाळेतील सुमारे २८६ मुला-मुलींनी सहभाग नोंदविला.
                 स्पर्धेतील यशस्वी मुले-मुली…..
• पहिली ते दुसरी: १) निसर्ग कारंडे,  २)विश्वजीत विशाल वडगावकर, ३) सम्राज्ञी अमोल आरेकर, ४) साईश कड – देशमुख उत्तेजनार्थ: आराध्या राहुल माने.
• तिसरी ते चौथी: १)अक्षरा पाटील, २)अर्णव निलेश बुधगावकर, ३) वेदांत निखिल कुंभार, उत्तेजनार्थ: आदित्य राजेंद्र माने.
• पाचवी ते सातवी: १) आर्यन सिद्धेश माळी प्रथम क्रमांक, २)ऋतुराज दत्तात्रय कुंभार,
३)हित जगदीश लिंबाणी, उत्तेजनार्थ: काव्या संदीप कातवरे उत्तेजनार्थ.
• आठवी ते दहावी: १) हेतवी हेतल मेहता, २)संध्या सिद्धेश्वर माळी, ३)सोहम रोहित सावेकर, उत्तजनार्थ: अस्मिता अमित आरेकर.
      सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धचे आयोजन महादेव वडणगेकर, सौ. सुनंदा वडणगेकर, सतीश वडणगेकर, संदीप कातवरे (शिल्पकार), अतुल आरेकर, भिकाजी आरेकर यांनी केले होते.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!