• रोट्रॅक्ट क्लब डीवायपी सनशाईनचा अनोखा उपक्रम
कोल्हापूर • प्रतिनिधी
रोट्रॅक्ट क्लब डी.वाय.पी. सनशाईनतर्फे पन्हाळा येथील बालग्राम (अनाथ आश्रम)मधील मुलांना व्हॅलेंटाईन डेनिमित्त शैक्षणिक मार्गदर्शन करून गरजू वस्तू व खेळाचे साहित्य भेट देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला.
असं म्हणतात की व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस असतो. या दिवशी प्रेम व्यक्त करतात. आयुष्यात प्रत्येकाला प्रेमच हवं असतं,पैसा काय काहीपण करून कमावता येतो, पण इथे प्रत्येकाला गरज आहे ती म्हणजे प्रेमाची. मग प्रेमाची गरज खरंच कुणाला आहे हे जाणून घेऊन डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील रोट्रॅक्ट क्लबमधील मुला-मुलींनी एक अनोखा उपक्रम राबवला.
रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष प्रतिक राऊत व सेक्रेटरी सचिन मान्टे व सर्व क्लब मेंबर्स या मुलांनी व्हॅलेंटाईन डे ला पन्हाळा येथील बालग्राम म्हणजेच अनाथ आश्रमाला भेट दिली. एक भाऊ व बहीण म्हणून आश्रमातील मुलांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेऊन त्यांना पुढच्या शिक्षणाबद्दल योग्य ते मार्गदर्शन करुन सविस्तर माहिती दिली. त्यानंतर त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळ खेळून त्यांना क्रिकेट खेळाचे साहित्य भेट दिले. त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम या क्लबने केले. बालग्रामची मुलंसुद्धा भान हरवून या क्लबच्या मुलांमध्ये मिसळली. त्यांच्याबरोबर गप्पा करून, खेळून, त्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून त्या समस्याचे निराकरण करण्याचे काम या क्लबने केले.
या कार्यक्रमासाठी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ.संतोष चेडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले
Excellent