• स्व. डी. सी. नरके चषक स्पर्धा रविवारपासून
कोल्हापूर • प्रतिनिधी
कुडित्रे (ता. करवीर) येथे दि.१४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत स्व. डी. सी. नरके राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्व. डी. सी. नरके विद्या निकेतनच्या मैदानावर स्पर्धेतील सामने होतील. सांगरूळ फुटबॉल क्लबच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती संयोजक संभाजी नाळे यांनी दिली.
डी. सी. नरके यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी आमदार चंद्रदीप नरके आणि अजित नरके यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या फुटबॉल स्पर्धेचे ९ वे वर्ष आहे. ग्रामीण भागातील फुटबॉलला चालना देण्यासाठी होत असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील ग्रामीण व शहरी संघांना सहभागी होता येईल. ग्रामीणमधील पहिल्या ३२ तर शहरातील १६ संघांना प्राधान्य दिले जाईल.
बक्षीसांचे स्वरूप …….
स्पर्धेतील विजेत्या संघास २१ हजार रुपये तर उपविजेत्या संघास १५ हजार रुपये व चषक देण्यात येईल. तृतीय क्रमांकास ११ हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी ७ हजार रुपये व चषक बक्षीस आहे. तसेच स्पर्धेतील बेस्ट फॉरवर्ड, बेस्ट हाफ, बेस्ट डिफेन्स, बेस्ट गोलकिपर त्याचप्रमाणे मॅन ऑफ दी सिरीज व मॅन ऑफ दी मॅच यांना गौरविण्यात येणार आहे.