कोल्हापूर • प्रतिनिधी
संजय घोडावत पॉलीटेक्निकचे इलेक्ट्रीकल इंजिनीरिंग विभागाचे प्रा.नितीन सुधीर जाधव यांना लोकराजा छत्रपती शाहू महाराज चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी या संस्थेतर्फे २०२१ या वर्षाचा ”राज्यस्तरीय आदर्श शिक्षक लोकराजा शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
प्रा.नितीन जाधव यांनी सपत्नीक हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराचे वितरण इचलकरंजी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाहू महोत्सवचे संकल्पक अरुण कांबळे, रवी राजपुते उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल संजय घोडावत पॉलीटेक्निकमार्फत प्राचार्य विराट गिरी यांच्या हस्तेही त्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रा.नितीन जाधव यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रा.जाधव हे चोकाक गावचे असून सुरुवातीपासूनच त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड आहे. ते गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करतात. त्यांनी एम जी युथ फौंडेशनच्या माध्यमातून रुकडी परिसरात महापूर व कोरोनाच्या संकटामध्ये सामाजिक भान जपून गरजूना मदत केली आहे. ते एक करिअर समुपदेशक असून त्यांनी समुपदेशित केलेली हजारो विद्यार्थी आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.
प्रा. जाधव यांचे शिक्षण एम टेक.पॉवर सिस्टिम असून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकेमध्ये आपले शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. तसेच इलेक्ट्रिकल सबस्टेशन प्रॅक्टिसेस या विषयावर त्यांनी एक पुस्तक देखील प्रकाशित केले आहे. महाराष्ट्रातील डिप्लोमा इलेक्ट्रिकलचे सर्व विद्यार्थी त्यांचे पुस्तक संदर्भासाठी वापरतात.
——————————————————- Attachments area