घोडावत पॉलिटेक्निकमध्ये “पीएलसी प्रोग्रॅमिंग” विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर सितारगंज व कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, संजय घोडावत पॉलिटेक्निक, अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने “पीएलसी प्रोग्रॅमिंग” या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा झाली असल्याची माहिती कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा.अजय कोंगे यांनी दिली.
     कार्यशाळेमध्ये पीएलसी प्रोग्रॅमिंग आवड असणारे आणि या क्षेत्रात काम करीत असणारे युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. त्याचप्रमाणे या कार्यशाळेस सुशिक्षित बेरोजगार, महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटीआय, डिप्लोमा, डिग्रीचे विद्यार्थी यांचादेखील सहभाग होता. 
     या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून एमएसएमईचे आदित्य चौधरी आणि त्यांची टीम लाभलेले आहेत. या कार्यशाळेस सहभागी होणाऱ्या सर्वांना एमएसएमईचे शासनमान्य ई प्रमाणपत्र मिळणार आहे. या प्रमाणपत्राचा उपयोग उद्योग आधार नोंदणीसाठी तसेच शासकीय योजनेतील कर्ज प्रकरणासाठी उपयुक्त असेल.
या कायर्शाळेच्या आयोजनाला प्रा.अजय कोंगे व प्रा. आर.एम. मुल्ला यांचे सहकार्य लाभले.
      याबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!