क्रिडाई व केडीएम ग्रुपकडून महापालिकेस अत्याधुनिक यांत्रिकी बोट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     क्रिडाई व केडीएम ग्रुपकडून महानगरपालिकेस अत्याधुनिक यांत्रिकी बोट व ओ.बी.एम.इंजिन आणि लाईफ जाकेट देण्यात आले. महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात पालकमंत्री सतेज डी.पाटील यांच्या हस्ते प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे ही बोट सुपूर्द करण्यात आली. कोल्हापूरमध्ये येणाऱ्या आपत्कालीन पूरपरिस्थितीत नागरिकांच्या बचावासाठी उपयोगी पडणार आहे. ही यांत्रिकी बोट नऊ लाखाची आहे.
     यावेळी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, क्रिडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजू परीख, महेश यादव, जेष्ठ सभासद कृष्णा पाटील, प्रदिप भारमाट, गौतम परमार, श्रीधर कुलकर्णी, श्रेयांस मगदूम, संदिप मिरजकर, अजय डोईजड, महेश पोवार, लक्ष्मीकांत चौगुले, माजी नगरसेवक संजय मोहिते, अर्जुन माने, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, सचिन पाटील, आदिल फरास, मधुकर रामाने, राहुल माने यांच्यासह शिवानंद बनछोडे, आशपाक आजरेकर आदी उपस्थित होते.
——————————————————-

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!