राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने मंत्री श्री. मुश्रीफ यांचा सत्कार

Spread the love

       
           
• बदलीच्या सुधारित आदेशामुळे शिक्षकांकडून कृतज्ञता
 कोल्हापूर • प्रतिनिधी
     ग्रामविकास विभागाकडून काढलेल्या शिक्षकांच्या बदल्या संदर्भातील सुधारित आदेशामुळे शिक्षकवर्गात समाधान आहे. त्यामुळेच विविध शिक्षक संघटनांकडून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे सत्कार होत आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने कागलमध्ये मंत्री श्री. मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला.
     याप्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शिक्षण हा सशक्त राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे. तो अधिकाधिक मजबूत होण्यासाठी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सरकारदरबारी पाठपुरावा करू.
     यावेळी संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे म्हणाले, शिक्षकांच्या बदलीचा हा सुधारित आदेश अधिकाधिक शिक्षकांना न्याय देणारा आहे.
      यावेळी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मंत्री श्री. मुश्रीफ यांना काही मागण्यांचे  निवेदन देवून लवकरात लवकर शुद्धीपत्रक काढण्याची विनंती केली.
      यावेळी जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, गडहिंग्लज तालुका संघाचे नेते सुभाष निकम, बँकेचे अध्यक्ष प्रशांत पोतदार, उपाध्यक्ष अरुण पाटील, बँकेचे माजी अध्यक्ष बजरंग लगारे, शिवाजी पाटील, साहेब शेख, जी.एस. पाटील, दिलीप पाटील, माजी उपाध्यक्ष बाजीराव कांबळे, संचालक आण्णासो शिरगांवे, शिक्षण समिती सदस्य तानाजी पोवार, तालुका अध्यक्ष मारुती दिंडे, अनिल चव्हाण, मदन कांबळे, राजेंद्र मांडेकर, तुकाराम राजूगडे, सरचिटणीस संजय ठाणेकर, रविंद्र दोरुगडे, गणपती पाथरवट, विजय मालाधरे, विशाल प्रभावळे, पांडुरंग रावण, आर. डी. जाधव, बाबाजान पटेल, गणेश माळी, राहूल कदम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!