राज्याच्या नगरविकास विभागाकडून पाच नगरपालिकांसाठी निधी मंजूर

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मुरगुड, कागल, आजरा, गडहिंग्लज व चंदगड या नगरपंचायतींना वैशिष्ट्यपुर्ण कामांकरीता जास्तीत जास्त निधी मिळावा यासंदर्भात नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार या तीन नगरपालिका व दोन नगरपंचायतींकरीता नगरविकास विभागाकडून साडेतीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
      खासदार मंडलिक म्हणाले, नगरविकास विभागाकडून राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपुर्ण कामाकरीता विशेष अनुदान दिले जाते. या योजनेमध्ये हाती घ्यावयाची कामे ही नागरिकांच्या लक्षात येतील अशा स्वरुपांच्या कामांनाच प्राधान्य देणेत येते. त्या अनुषंगाने गडहिंग्लज नगरपरिषद हद्दीतील हिरण्यकेशी नदीघाटाचे संवर्धन व विकसीत करणे यामध्ये प्रामुख्याने दशक्रियेसाठी रुम, चेंजींग रुम, पारकट्टा बांधकाम, संरक्षक भिंत, दगडी पायरी वाढीव बांधकाम, पाछवे करणे, स्वच्छतागृह बांधकाम आदी कामे होणार आहेत. आजरा नगरपंचायतीकरीता ओल्या कचऱ्यापासून विद्यूत निर्मीती प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असल्याकारणाने विजेची बचत होणार आहे. 
      मुरगूड नगरपालिका वाढीव पाणी पुरवठा योजनेकरीता नगरपंचायत हद्दीतील रस्त्याची खुदाई झाली असल्याकारणाने याठिकाणी नविन रस्त्यांसाठी एक कोटी रु. चा निधी मंजूर झाला आहे. कागल नगरपालिकाअंतर्गत आवश्यक त्या ठिकाणी हायमास्ट दिवे बसविणार असून यासाठी पंधरा लाख रु. तर चंदगड नगरपंचायत अंतर्गत शिवशक्ती स्थळासभोवती बगीचा व तत्सम मुलभूत सुविधा पुरविणे याकरीता वीस लाख रु. असे एकूण साडेतीन कोटी रु. मंजूर झाले आहेत.
      दरम्यान, नगरपालिका व नगरपंचायतींच्या मुलभूत व आवश्यक त्या कामांकरीता भरघोस निधी प्राप्त झाला असल्याकारणाने पाचही नगरपंचायतींच्यावतीने खासदार संजय  मंडलिक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!