गुणवत्ता विकासासाठी ‘शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा’ मार्गदर्शक

Spread the love

 

• मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन
 कोल्हापूर • प्रतिनिधी
     कागलचे गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी शैक्षणिक प्रयोगांबाबत स्वानुभवावर लिहिलेले ‘शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा’ हे पुस्तक शालेय गुणवत्ता विकासासाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल येथील बहुउद्देशीय सभागृहामध्ये पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ना.मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे उपस्थित होते.
      गटशिक्षणाधिकारी म्हणून शाहूवाडी,  गडहिंग्लज व कागल तालुक्यात केलेल्या विविध सकारात्मक प्रयोगांबाबत लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन ना.मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.
      मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले. त्यांचे बालपण हरवत आहे. अनेक बालके अनाथ झाली त्यांचे नाथ होण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करावा. डॉ कमळकर यांचे हे पुस्तक शिक्षकांच्यात आत्मविश्वास व प्रेरणा जागवेल.
     डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, डॉ. कमळकर यांच्या पुस्तकाचे वाचन, मनन करून ते कृतीत उमटवण्याचा प्रयत्न शिक्षकांनी, अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा अजून सक्षम होतील.
      जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, शिक्षकांनी काळाची पावले ओळखली पाहिजेत व विद्यर्थ्याना शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये. डॉ. कमळकर यांच्या पुस्तकाचा समावेश जिल्हा परिषदेच्या पुस्तक यादीमध्ये केला जाईल, असेही सांगितले.
      यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पूनम मगदूम, उपसभापती सौ. अंजना सुतार, सदस्य रमेश तोडकर, गटविकास अधिकारी सुशील संसारे, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, अमेय जोशी, चंदकांत निखाडे, विश्वास सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.        
     प्रास्ताविक डॉ. जी. बी. कमळकर यांनी तर सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. शिक्षण सहसंचालक सुभाष चौगले, मधुकर भोसले यांचीही भाषणे झाली. आभार विस्तार अधिकारी आर. एस. गावडे यांनी मानले.
——————————————————- Attachments area

ReplyForward

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!