लसीकरण संदर्भातील गोंधळ थांबवण्याची मागणी

Spread the love

 
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोना युद्धात लसीकरण हे ब्रम्हास्त्र आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांना कोरोनाचा अगदी नगण्य प्रादुर्भावाचे प्रमाण अाहे. सध्या लसीकरणासाठी प्रत्येक केंद्रावर गर्दी होत आहे. लसीकरण केंद्रे तेवढीच व  लसीचा तुटवडा आणि योग्य नियोजन नसल्यामुळे लसीकरण कार्यक्रमाचा अक्षरशः बोजवारा उडाला असून सर्वत्र गोंधळ जाणवतो. हा लसीकरण संदर्भातील गोंधळ थांबवून नागरिकांना त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने किशोर घाटगे यांनी केली आहे. त्यासंदर्भात जिल्हा लसीकरण अधिकारी फारूक देसाई यांना शिष्टमंडळाने आज निवेदन दिले.
      सर्वच लसीकरण केंद्रांवर रोज गर्दी, वादावादी, सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा यामुळे कोरोना होण्याचा धोका अधिक संभवतो. अशातच ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांना फक्त लस देण्याचे जाहीर केले आहे. पण ज्यांचेकडे मोबाईल नाहीत अशा नागरिकांचे काय? ज्यांनी पहिली लस घेतली आहे व दुसरा डोसची तारीख आली आहे ते नागरिक COWIN ॲप व आरोग्य सेतू नोंदणी होत नसल्याने रोज हेलपाटे मारत आहेत. अशा समस्या असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
     कोल्हापूर शहरात प्रभाग निहाय लसीकरण केंद्रे करावीत. लसीकरण केंद्रांवर वेगवेगळ्या विभागात रांगेद्वारे लसीकरण करावे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर माहिती देण्यासाठी व ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी जनसंपर्क कर्मचारी नेमावा. प्रत्येक लसीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय असावी. अनेक नागरिक रांगेत उभे असतानाच लस संपली आहे, असे सांगण्यात येते म्हणून प्रत्येक केंद्रावर प्रत्येक विभागासाठी किती लस उपलब्ध आहे त्याची माहिती सांगावी व तेवढेच टोकण लोकांना द्यावेत. नागरिक त्रास सहन करीत प्रशासनाला सहकार्य करीत आहेत पण त्यांचा अंत न पाहता प्रशासनाने त्वरित योग्य नियोजनाची पावले उचलावीत व  लसीकरणातील गोंधळ थांबवावा अशी मागणी शिवसेनेच्यावतीने किशोर घाटगे यांनी केली.
      यावेळी जिल्हा लसीकरण अधिकारी फारूक देसाई यांनी सदरच्या सूचना योग्य असून त्वरित अंमलबजावणी केली जाईल. ग्रामीण भागात लसीकरण सुरळीत आहे पण शहरातील त्रुटी दूर करू असे आश्वासन दिले.
      यावेळी रियाज बागवान, सनी अतिग्रे, सुरेश कदम, राकेश पोवार, अनंत पाटील, सागर कलकुटगी, रईस बागवान आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!