संजय घोडावत शिक्षण संकुलाच्या स्टुडन्ट फौंडेशनकडून कस्तुरी सावेकरला १ लाखाची मदत


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूरची युवा गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिला संजय घोडावत इन्स्टिट्यूट व संजय घोडावत विद्यापीठाच्या स्टुडन्ट सोशल फौंडेशनने नुकतीच १ लाख रुपयांची मदत केली आहे.
      कस्तुरी ही संजय घोडावत ज्युनिअर कॉलेजमध्ये १२वी सायन्स या वर्गात सध्या शिकत आहे. इयत्ता ११ वी मध्ये असताना तिने एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा निर्धार केला होता परंतु घरची परिस्थिती बिकट असल्याने तिच्या या निर्धाराला गरज होती ती आर्थिक आधाराची. यावेळी घोडावत विद्यापीठात आयोजित विविध कार्यक्रमात तिने मदतीचे आवाहन केल्यावर संजय घोडावत शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांनी तिला भरघोस आर्थिक मदत पुरविली. तसेच तिचे हे स्वप्न पाहून उद्योगपती संजय घोडावत यांनी ११ वी व १२ वी ची दोन्ही वर्षाची फी माफ करून तिच्या स्वप्नरूपी पंखांमध्ये बळ देण्याचे काम केले. घोडावत शिक्षण संकुलाचे योग्यवेळी पाठबळ मिळाल्यामुळे तिने मागे वळून पाहिले नाही आणि याचेच फलित आज ती एव्हरेस्टच्या शिखराच्या तिसऱ्या कॅम्पमध्ये यशस्वीरीत्या पोहचली आहे. दोनच दिवसात ती एव्हरेस्ट सर करेल आणि ती एव्हरेस्ट सर करणारी कोल्हापूरची पहिली महिला ठरणार आहे. या मोहिमेसाठी जगभरातून २५० जणांची निवड झाली होती त्यापैकी कस्तुरी एक आहे.
       याबाबत बोलताना उद्योगपती  संजय घोडावत म्हणाले ” कस्तुरी ही खूप मेहनती मुलगी आहे. एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न पाहणारी व ती सत्यात उतरवणारी कोल्हापूरची ती खऱ्या अर्थाने हिरकणी आहे. हे शिखर लवकरात लवकर ती सर करून देशातील तरुण तरुणींसाठी आयडॉल बनणार आहे. तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *