विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्त करावे: प्रा. कोंगे

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर कौशल्यही प्राप्त केले पाहिजे. कौशल्य असेल तर विद्यार्थी नक्कीच यशस्वी उद्योजक होतील, असे प्रतिपादन संजय घोडावत विद्यापीठाचे कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागचे प्रमुख समन्वयक  प्रा. ए. बी. कोंगे यांनी केले.
     इचलकरंजी येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय अंतर्गत आयोजित उद्योजकता वाढीसाठी शासकीय योजना या एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
     ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन व बीजभाषण संजय घोडावत विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. ए. वाय. सालती यांनी केले. कौशल्य विकास उद्योजकता वाढीसाठीच्या विविध शासकीय योजनांची विस्तृत माहिती प्रा. कोंगे यांनी विद्यार्थ्यांना दिली. 
     दुसऱ्या सत्रात सीए बी. एन. ठिगळे यांनी मार्गदर्शन केले. उद्योग क्षेत्रात नानाविध बदल घडत असतात. मात्र यास अर्थसहाय्यता महत्त्वाची असते. उद्योग घडवण्यासाठी त्याच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे असल्याचे सांगून लागणारी अर्थसहाय्यता व सबसिडी याबाबत श्री. ठिगळे यांनी मार्गदर्शन केले.
     स्वागत प्राचार्य डॉ. विजय माने यांनी केले. प्रास्ताविक समन्वयक उपप्राचार्य एन. एम. मुजावर यांनी केले. एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेत शंभरहून अधिक विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. आभार प्रा. बी. एम. कांबळे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!