‘स्टुडिओ ओक्युलुस’ची राष्ट्रीय पातळीवर नोंद


कोल्हापूर • प्रतिनिधी
    आर्किटेक्चर या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्ती अथवा कंपन्यांना ‘नॅशनल आर्किटेक्चर अँड इंटेरिअर डिझाईन एक्सीलन्स अवॉर्ड’ दिले जातात. यावर्षी एन्व्हायरमेंट अँड हेल्थकेअर प्रोजेक्ट्स या विभागामध्ये ‘लिडिंग आर्किटेक्चर अँड डिझाईन फर्म (वर्ष २०२०) म्हणून सदर पुरस्कार  कोल्हापूरमधील सौ. जानकी वैद्य यांच्या सुप्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनी ‘स्टुडिओ ओक्युलुस प्रा.लि.’ ने पटकावला आहे. हा कोल्हापूरच्या स्थापत्य विश्वाचाच गौरव ठरला आहे.
     बेंगळुरूमध्ये कुमार कन्सल्टंटस् या नामवंत आर्किटेक्ट फर्मचे मुख्य आर्किटेक्ट लीना कुमार आणि एस.जे.बी.आय.टी. इन्स्टिट्यूटचे प्रिन्सिपॉल डॉ. अजय चंद्रन सी. के. यांच्या हस्ते स्टुडिओ ओक्युलुस प्रा.लि. कंपनीच्या संस्थापिका व मुख्य आर्किटेक्ट सौ.जानकी वैद्य यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यासाठी जेष्ठ आणि नामवंत आर्किटेक्ट कृष्णराव जैसीम तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक नामांकित आर्किटेक्ट आणि इंटेरिअर डिझाईनर्स उपस्थित होते.
     स्टुडिओ ओक्यूलुस प्रा. लि. या आर्किटेक्चर कंपनीला १६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून कंपनीकडून प्रामुख्याने पर्यावरण पूरक बांधकाम आणि इंटेरिअर, नैसर्गिक वस्तूंचा जास्तीतजास्त वापर तसेच रिसायकलिंग या गोष्टींचा प्रोजेक्ट समावेश केला जातो. स्टुडिओ ओक्युलुस प्रा. लि. ने कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्र, पुणे, ठाणे, मुंबई, गोवा या ठिकाणी घरे, बंगले, व्हीलाज, अपार्टमेंटस्, हॉटेल्स, रिसॉर्टस्, हॉस्पिटल्स आणि इतर प्रकारचे अनेक प्रोजेक्ट्स यशस्वीपणे पूर्ण करून दिलेले आहेत. कंपनीकडे  वेगवेगळे कौशल्य असणारी १४ जणांची टीम असून कंपनीच्या कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथे शाखा आहेत.
     कुठलाही प्रोजेक्ट ठरलेल्या वेळेत पूर्ण करून देण्याबाबत स्टुडिओ ओक्यूलुस प्रा.लि.ची खासियत आहे. कंपनीच्या या सर्व वैशिष्ठयांमुळे अनेक समाधानी क्लाइन्ट्स त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी स्टुडिओ ओक्युलुस प्रा. लि.चीच निवड करतात. कोल्हापूरच्या                              जानकी वैघ यांनी अल्पावधीतच मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी सृजनशील दखलपात्र कामे करुन आपली विधायक प्रतिमा स्थापत्यविश्वात निर्माण केली आहे. हा पुरस्कार त्याचीच एक पोचपावती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *