राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत घोडावत ऑलिम्पियाड स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश


कोल्हापूर •  प्रतिनिधी
     संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा अर्थातच एन. टी. एस. ई. अंतिम परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. यामध्ये ऑलिम्पियाड स्कूलच्या देव छेडा व अनुष्का कांबळे यांचा समावेश आहे.  तसेच ईशान म्हेत्रे आणि योगेश नेजे या विद्यार्थ्यांनी नुकताच संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांनीही या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून राष्ट्रीय प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
     राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा ही राष्ट्रीय पातळीवर दोन फेरीत घेण्यात येते. यामध्ये प्रथम फेरीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दुसऱ्या फेरीला पात्र ठरतात. दुसऱ्या फेरीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.
     या यशाबद्दल बोलताना संचालक श्री.वासू म्हणाले की, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेतील यश ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. यशाला कोणताही शॉर्टकट नाही. जिद्द, मेहनत व चिकाटी असेल तर यश दूर नाही. विद्यार्थी, पालक व स्टाफनी केलेल्या मेहनतीचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले आहे. ऑलिम्पियाड स्कूलने आपल्या उच्चांकी निकालाच्या माध्यमातून पालक व विद्यार्थी यांची विश्वासाहर्ता प्राप्त केली आहे आणि यापुढेही यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी आम्ही तत्पर राहू असे बोलून त्यांनी सर्व विद्यार्थी, पालक व स्टाफ चे अभिनंदन केले.
     त्याचबरोबर संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी यशस्वी विद्यार्थी, संचालक श्री.वासू , झोनल हेड श्री. प्रभू व सर्व स्टाफचे अभिनंदन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *