कलर बेल्ट परीक्षेत ट्रायम्फ तायक्वाँदो ॲकॅडमीचे यश

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     येथील टायम्फ तायक्वाँदो ॲकॅडमीच्यावतीने घेण्यात आलेल्या कलर बेल्ट परीक्षेत ३८ खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात रामानंदनगर, गजानन महाराजनगर, रंकाळा टॉवर केंद्र परिसरातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
     परीक्षेत यलो बेल्ट मिळविणारे खेळाडू असे : शिवराई यादव, रुद्र खोडके, राधिका क्षत्रीय, अंशुमन शिंदे, सार्थक कांबळे, अर्णव कांबळे, शिवतेज कांबळे, भाग्यश्री पालकर, अनिकेत सुरगोंड, ऋषीकेश कुकरेजा, धनश्री पाथरुट, आयुष पाथरुट, सात्वीक पाटील, आर्यन दुर्गुळे, आराध्या ढाले, काश्वी माने, भूमि सुतार, निधी सुतार, दिया सासने, मुग्धा शेळके, आदित्य माेरे, सई पवार, अविघ्न पाटील, प्रणाली नाळकर, दक्ष तांबेकर, मणिकर्णिका मोरे, राज चावरे, अनघा घाटगे, वरदा तांबेकर, समर्थ तांबेकर, शरयू देसाई, अन्वी देसाई, शिवराज चौगले, आर्य मोरे, सुयश बरवासे, शौर्यजीत पाटील, श्लोक पाटील, मीत बरवासे या खेळाडूंनी यलो बेल्ट मिळविला.
      खेळाडूंना प्रशिक्षक सागर कोपार्डेकर, अनया कुलकर्णी (पांडव) व  आशिष तांबेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
      येलो बेल्ट मिळविलेल्या या खेळाडूंना माजी नगरसेवक किरण नकाते, सतिश लोळगे, संजीवनी देसाई, साक्षी पाटील व  सतिश भाले यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!