ॲपेक्स नर्सिंग होममध्ये कोलंबियातील स्त्री रुग्णावर यशस्वी उपचार

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
       येथील शिवाजी पार्क परिसरातील ॲपेक्स नर्सिंग होममध्ये अस्थितज्ज्ञ डॉ. उमेश जैन यांनी कोलंबिया येथील स्त्री रूग्णावर ७ मार्चला यशस्वी शस्त्रक्रिया केली.
       याविषयी माहिती देताना डॉ.उमेश जैन यांनी सांगितले की, साऊथ अमेरिकेतील कोलंबिया देशातील निवासी ‘ मारिया ‘ यांना संधिवातामुळे सांधे झिजल्याने खूप त्रास सहन करावा लागत होता. उठणे बसणे, चालणे, फिरणे या सर्वच हालचालींसाठी जीवघेणा त्रास जाणवत होता.
      २०१९ साली कोव्हिडच्या वाढण्यापूर्वी मारिया यांचे स्नेही सुनील पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे मारिया यांनी टेलिमेडिसिन द्वारा स्वतःच्या दुखण्याबाबत चर्चा सुरु केली. दुबईतील त्यांच्या मुलीनेही चर्चा केली व प्रत्यक्ष तपासणीसाठी कोल्हापुरात येण्याविषयी सुचवले.
       याकाळात मारियाने आणि दंतवैद्यक असलेल्या त्यांच्या मुलीने बारीकसारीक शंका व मनातील प्रश्न डॉ. जैन यांच्याशी बोलून शस्त्रक्रिया करूनच घ्यायची, असा विचार पक्का केला. यापूर्वी मारिया भारतात मुंबई, गोवा येथे भ्रमंतीसाठी आल्या होत्या. पण खुबारोपण शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र – कोल्हापूर येथील ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
       देश, भाषा, संस्कृती सारेच भिन्न असणारे अपरिचित कोल्हापूर, त्यामुळे त्यांच्या मनात भीती होतीच. परंतु डॉ. जैन यांनी अत्यंत आस्थेने व मनापासून धीर दिला व मायलेकींना निर्धास्त केले. त्यांची सर्व वैद्यकीय पाहणी आणि तपासणी केल्यानंतर ऑपरेशन तीन तास चालले. प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. संदीप कदम हे सहयोगी डॉक्टर होते. डॉ. कदम यांनी “रामकृष्ण हरी” हा मंत्र मोबाईलवर लावून ठेवला. मारिया त्या मंत्राच्या प्रभावी लहरींमध्ये साऱ्या वेदना विसरून गेली. डॉक्टरना शस्त्रक्रियेच्यावेळी अत्यंत सहकार्य केले व शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
      शास्त्रक्रियेनंतरचे दिवस अत्यंत महत्वाचे होते. जंतुसंसर्ग होऊ नये, ड्रेसिंग स्वच्छता, देखभाल, आहार याबाबत काटेकोरपणे काळजी घेतली. अवघ्या आठ दिवसांत मारिया या स्वतःहून हिंडणे, फिरणे, काहीकाळ उभे राहणे व दैनंदिन व्यवहार समर्थपणे पार पडू लागल्या. काळजी घेणाऱ्या सर्व स्टाफबद्दल त्यांना खूप प्रेम वाटते. भाषा कळत नसली तरी हावभावांवरून त्यांनी मारियाशी हृदयाचे नाते जोडू जोडले.
      कोलंबियातील वैद्यकीय क्षेत्रापेक्षा भारतातील वैद्यकीय क्षेत्र हे अधिक प्रभावी वाटते. तिकडे डॉक्टरच्या वेळा निश्चित होण्यासाठी बराचसा वेळ जातो. डॉक्टर म्हणावा तेवढा वेळ देतीलच याची खात्री नसते व मुख्य म्हणजे वैद्यकीय उपचारासाठी अफाट खर्च आकाराला जातो. डॉक्टर्स व त्यांचा स्टाफ हा प्रथम वैद्यकीय नैतिक मूल्यास जपतो. भारतात येऊन योग्यवेळी इतकी उत्तम वैद्यकीय सेवा मिळाली. डॉ. जैन यांनी शास्त्रक्रियेतील निष्णांतपण सिद्ध केले आहे. ॲपेक्स हॉस्पिटलमधील वास्तव्य व माणुसकीचे प्रेमळ दर्शन ही अनमोल भेट सोबत घेऊन आम्ही कोलंबियाला जाऊ ” अशा शब्दात मारिया व त्यांच्या मुलीने कृतज्ञता व्यक्त केली, तेव्हा शब्दांपेक्षा अश्रूच जास्त बोलत होते.
       पत्रकार परिषदेस डॉ.निरंजन राठोड, डॉ. सुहास बडवे, डॉ. चेतन जुमराणी, डॉ. संदीप कदम आदी उपस्थित होते. 
——————————————————-
 Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!