सनी खाद्यतेलाचा राईस ब्रॅन प्रकारातील “प्रिया” ब्रॅण्ड बाजारात

Spread the love

 

• प्रिया ब्रॅण्डविषयी कंपनीमार्फत रंकाळा चौपाटीवर प्रबोधन
कोल्हापूर • प्रतिनिधी
     बाजारात विविध प्रकारची खाद्यतेले उपलब्ध आहेत. त्यातील एक अग्रणी ब्रँड म्हणून “सनी” सनफ्लॉवर ऑइल म्हणून सर्वांना माहित आहे.
     सनी खाद्यतेल सनफ्लाॅवर, सोयाबीन या वर्गवारीत येते. याच कंपनीने आपले राईस ब्रॅन प्रकारात प्रिया नावाचा ब्रॅण्ड बाजारात आणला असून त्याबद्दल लोकांना जनजागृती व्हावी यासाठी पहाटे रंकाळा चौपाटीवर फिरावयास येणाऱ्या ग्राहक तसेच गृहिणी यांना कंपनीमार्फत प्रबोधन करण्यात आले.
      यावेळी कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर विशांत भोसले, एरिया सेल्स एक्झिक्यूटिव्ह सुरज ठाणेकर, कंपनीचे अधिकृत वितरक ज्योतिर्लिंग ऑइल डेपोचे अमोल पाटील, लक्ष्मीनारायण एजन्सीचे रणजीत मांजरेकर तसेच कंपनीचे विक्री प्रतिनिधी अमित पौडकर, रणजित वाघमारे व युवराज भोईटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!