कोल्हापूरात आजपासून सुपर स्टार सर्कस

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      अबालवृद्धांचे मनोरंजन करण्यासाठी कोल्हापूरात १ मे पासून सुपर स्टार सर्कसचे खेळ सुरू होत आहेत. १ मे रोजी रात्री ७ वाजता मायबाप प्रक्षेकांच्या उपस्थितीत सर्कसला प्रारंभ होत असल्याची माहिती प्रोप्रायटर प्रकाश माने यांनी दिली. यावेळी व्यवस्थापक ज्वालासिंग उपस्थित होते.
     एस्तेर पॅटन हायस्कूल ग्राउंड, जिल्हाधिकारी कार्यालयजवळ नागाळा पार्क, कोल्हापूर याठिकाणी सुपर स्टार सर्कस आली आहे. सर्कसचे दररोज दुपारी एक वाजता, दुपारी चार वाजता आणि रात्री सात वाजता असे तीन शो होतील. लोकप्रिय अशा या सर्कसमध्ये ७०  कलाकारांचा सहभाग आहे. त्यामध्ये पाच जोकर आहेत. दोन तास निखळ मनोरंजन करण्यासाठी विविध प्रकारचे खेळ आहेत. यामध्ये हवाई झुला, चित्तथरारक कसरती, चिपांझी डान्स, जगलिंग, चायनीज डॉल, मोटरसायकल कसरतींचा समावेश असल्याचे प्रकाश माने यांनी सांगितले.  
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!