सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे दूध उत्पादक सभासदांना न्याय मिळाला: मंत्री मुश्रीफ


कोल्हापूर • प्रतिनिधी
     गोकुळच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे हा सभासदांचा विजय आहे. सत्ताधारी मंडळी सारखी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत होते. त्यांचा आत्मविश्वास नव्हता. मात्र या निकालामुळे दूध उत्पादक सभासदांना न्याय मिळालेला असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत दिली.
       यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, सत्ताधारी मंडळींनी आत्मविश्वास गमावल्यामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र परमेश्वर आणि नीती सभासदांच्या मागे असल्याने हा सभासदांचा विजय असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
       यावेळी भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांना रेमेडीसीविर इंजेक्शन मिळतात याबाबत विचारले असता नामदार मुश्रीफ यांनी खासदार सुजय विखे पाटील यांनी रेमडेसीविर इंजेक्शन हिमाचल प्रदेशातून आणली आहेत. या इंजेक्शनच्या सत्यतेसाठी जनहित याचिकाही दाखल झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे केंद्र सरकारच्या पाया पडतो म्हणाले होते, इतकी विनंती करूनही आम्हाला इंजेक्शन मिळत नाहीत. पण भाजपला कसे इंजेक्शन मिळते असा सवाल उपस्थित करत भाजपला इंजेक्शन देणार तर द्या पण लोकांना तडपडून मरू देऊ नका, अशी विनंती मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *